जे मनात आलं ते लिहीत गेलो. कदाचित लिहूच नये असं वाटलं तर? तर काय वाहवाच! डोक्यावर गोधडी पांघरून मस्त झोपून जाणं...
नाना गुरूजनांकडून समजून घेऊन मांडलेले हे आणखी काही प्रश्न. बहुतेक सगळे प्रश्न माणसाने तयार केलेले. माणूस खरंतर एवढा बुद्धिमान. पण आपली हाव, अतिरिक्त तहान, वखवख आणि ती भागवण्यासाठी निसर्गसंहार करताना हे पुढे आपल्या मुळावर येणार हे त्याला कसं कळलं नाही?हे प्रश्न चिघळत जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला जमेल तेवढं काम केलं पाहिजे. त्यासाठी या पुस्तकाची मदत होईल ही अशी आशा आहे.......